Ratnagiri: निवळी-जयगड मार्गावरील ओव्हरलोड वहातुक तत्काळ बंद करावी अन्यथा रस्ता रोको आंदोलन; भाजपाचा निर्वाणीचा इशारा

0
25
माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश
माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी: निवळी जयगड रोडवर रोज मोठया प्रमाणात ओव्हरलोड वहानांमार्फत वहातूक होत असल्याने रस्त्यावर प्रचंड खड्यांचे साम्राज्य पसरले असून त्याचा त्रास स्थानिकांना होत आहे,या रस्त्यावर अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे याबाबतीत वारंवार संबंधित यंत्रणेला सांगून ही दुर्लक्ष केले जात आहे.तसेच शाळेच्या वेळेत तरी किमान वहातुक बंद ठेवावी अशी ही मागणी वारंवार करण्यात आली याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याने आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अँड दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ओव्हरलोड होणारी वहातुक तात्काळ बंद करावी असे निर्वाणीचे निवेदन देण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/sindhudrg-बुडून-बेपत्ता-झालेल्या/

तसेच 20 ऑक्टोबर पूर्वी ओव्हरलोड वहानांची वहातुक बंद न केल्यास रस्त्यावर उतरुन रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा निर्वाणीचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी रत्नागिरी तालुका अध्यक्ष- मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस, ओंकार फडके, तालुका उपाध्यक्ष, संकेत कदम ,भाजपा ओबीसी सेल तालुकाप्रमुख नंदू बेंद्रे, नंदकिशोर चव्हाण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here