Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सहा बाधित

0
94
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका;केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

रत्नागिरी- जिल्ह्यात कोरोनाचे सहा बाधित रुग्ण असून त्यातील ४ जण गृह विलगीकरणात तर २ संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी नोंद झालेल्या तीन बाधितांना लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तरीही आरोग्य विभाग सतर्क असून कोरोनाशी निगडीत लक्षणे असलेल्यांची तपासणी केली जात आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आमदार-वैभव-नाईक-यांच्या-4/

देशभरात कोरोनाचे एक हजारहून अधिक बाधित सापडले आहेत. त्यामुळे कोरोना पुन्हा शिरकाव करणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्याप्रमाणात दाखल होत आहेत. आरोग्य विभागानेही सतर्कता म्हणून कोरोनाची चाचणी करण्यावर भर दिला आहे. प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांचीही तपासणी केली जाते. जिल्ह्यात ६ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यातील संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यापैकी एक डेरवण येथे असून दुसरा मुंबईत केईएमला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. कोरोनाचे बाधित वाढू नयेत यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here