Ratnagiri: रत्नागिरी रेल्वे स्थानक ते उक्षी रेल्वे स्थानकादरम्यान तोतया टीसीला अटक

0
43
रत्नागिरी रेल्वे स्थानक ते उक्षी रेल्वे स्थानकादरम्यान तोतया टीसीला अटक
रत्नागिरी रेल्वे स्थानक ते उक्षी रेल्वे स्थानकादरम्यान तोतया टीसीला अटक

रत्नागिरी– गर्दीचा फायदा उठवून गाडीत प्रवाशांचे तिकीट तपासणाऱ्या ताेतया टीसीला रेल्वे पाेलिसांनी अटक केली आहे. अंकुश तुकाराम तेलवाडे (३२, रा. जव्हार, जि. पालघर) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई रत्नागिरी रेल्वे स्थानक ते उक्षी रेल्वे स्थानकादरम्यान करण्यात आली.https://sindhudurgsamachar.in/kokan-जिल्हास्तरीय-निबंध-लेखन/

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीचा फायदा उठवत अंकुश तेलवाडे ताेतया टीसी बनून प्रवास करत हाेता. ०११७२ सावंतवाडी – सीएसटी ही गणपती विशेष गाडी मुंबईकडे जात हाेती. ही गाडी रत्नागिरीहून मुंबईकडे जात असताना रात्री १० ते १०:३० वाजता या कालावधीत रेल्वेचे टीसी मंगेश साळवी व प्रवीण लाेके हे तिकीट तपासत हाेते.

त्यादरम्यान त्यांना अंकुश तेलवाडे प्रवाशांचे तिकीट तपासत असल्याचे लक्षात आले. त्याने ७ प्रवाशांकडून प्रत्येकी १०० रुपये घेतल्याचेही लक्षात आले. काही प्रवाशांची तिकीट तपासताना त्यांनी आत्ताच तिकीट तपासल्याचे सांगितल्याने हा प्रकार समाेर आला.त्यांनी त्वरित मागोवा घेत ताेतया टीसी अंकुश तेलवाडे याला रेल्वे पोलिसांच्या मदतीने पकडले. त्याच्याविराेधात रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here