दापोली- एन.के. वराडकर विद्यालय, मुरुड आयोजित दापोली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चंद्रनगर शाळेतील विद्यार्थीनी कु. वेदिका मुलूख हिने उच्च प्राथमिक गटात द्वितिय क्रमांक पटकावला असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकण-पदवीधर-मतदारसंघाच्/
मुरुड येथील एन. के. वराडकर माध्यमिक विद्यालयात नुकतेच महर्षी अण्णासाहेब कर्वे स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक ते माध्यमिक गटात सुमारे सव्वाशेहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत गटवार सहभाग घेतला. या स्पर्धेतील उच्च प्राथमिक गटात ‘ भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे ‘ या विषयास अनुसरून आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत चंद्रनगर शाळेतील इयत्ता सातवीत शिकत असलेल्या कु. वेदिका सुभाष मुलूख हिने द्वितिय क्रमांक पटकावला. तिचे मार्गदर्शक शिक्षक बाबू घाडीगांवकर यांसह शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, शिक्षक मनोज वेदक, मानसी सावंत आदी अनेकांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.