Ratnagiri: शेजाऱ्यांशी झालेल्या वादातून महिलेची गोळ्या झाडून हत्या

0
110
हत्या,/बंदूक ,
Ratnagiri: शेजाऱ्यांशी झालेल्या वादातून महिलेची गोळ्या झाडून हत्या

रत्नागिरी– शेजाऱ्यांशी झालेल्या वादातून महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन संशियतांना शहर पोलिसांच्या पथकाने आंबेशेत येथून अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरजाना फिरोज (रा.मानखुर्द, मुंबई) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर सोनू सिंह (वय ५५) आणि त्याचा मुलगा अतीश सिंह ( २५) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-११-लाख-अपात्र-शेतकऱ्यां/

मानखुर्द पोलिसांचे पथक त्यांना घेऊन मुंबईला रवाना झाले आहे. खुनाची ही घटना मुंबईतील मानखुर्द इंदिरानगरमध्ये शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली . दोन कुटुंबांतील महिलांमध्ये आधी भांडण झाले . त्यात आधी मारहाण झाली. या दरम्यान एका महिलेच्या पती आणि मुलाने गोळीबार केला. ज्यात फरजना फिरोज हिच्या छातीत गोळी लागली. यानंतर महिलेला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. त्यानंतर मानखुर्द पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. गोळया झाडून हत्या नेमकी कोणी केली ? हे स्पष्ट होत नव्हते. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर सोनू सिंह त्याचा मुलगा अतीश सिंह या दोघांनी हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते.

सोनू सिंह, मुलगा अतीश सिंह यांनी हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु केला होता. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पाहिल्यानंतर ते दोघे रत्नागिरीतील आंबेशेत येथे असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मानखुर्द पोलिसांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विनित चौधरी यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here