प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
संगमेश्वर– टँकरमधून सहा लाख ६१ हजार सातशे दहा रुपये किमतीचा एलपीजी गॅस चोरी झाल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. टँकरचालक शमशाद खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-ट्रक-चालकाची-चूक-10-जणांच्/
याबाबत शुभांक विजेंद्रपाल सिंग, यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की जयगड पोर्ट जेटीमध्ये टँकरमध्ये गॅस भरल्यानंतर आमचे कंपनीचे व जेएसडब्ल्यू कंपनीचे असे दोन सिल होतात. दर दिवशी साधारण १०० टँकर गॅस भरून जयगड येथून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात. टँकरवर जीपीएस लावलेले आहेत. कंपनीचा टँकर क्रमांक देवून कळंबोली येथून जयगड पोर्टकरीता रवाना झालेला होता.
जयगड पोर्ट येथे १९ डिसेंबर रोजी १७.७५ टन गॅस भरून खोपोली, जि. रायगड येथे पोहचविण्याकरीता निघाला. हा टॅकर दिनांक २० डिसेंबर रोजी खोपोली येथे पोहचणे आवश्यक होत. परंतु तो तेथे पोहचला नाही म्हणून कंपनीचे ट्रान्सपोर्ट मॅनेजर सुरेंद्र दिवेदी यांनी चौकशी केली असता हा टँकर पनवेल येथे दिसल्याची माहिती मिळाली. दिवेदी यांनी पनवेल येथे जाऊन टँकर ताब्यात घेतला . या टँकरचे कळंबोली येथे वजन केले असता त्यामध्ये ११.५०० टन वजनाचे एल.पी.जी. गॅस कमी असल्याचे दिसले. तसेच जीपीएसवर तपासले असता हा टँकर मामळे संगमेश्वर येथे सुमारे ११ तास उभा असल्याचे दिसले. याच ठिकाणी टँकरमधून गॅसची चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.