कणकवली: १४ वा वित्त आयोगाच्या अंतर्गत होणा-या विकास कामांचा फलक लावण्यात यावेत शासनाने आदेश पळाले जात आहेत का?
विविध ग्रामविकास कामांची माहिती लोकांना दिसेल आणि स्पष्ट वाचता येईल असे फलक तयार करून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये लावण्यात यावेत यासाठीचे आदेश शासनाने देशातील सर्व ग्रामसेवक. तलाठी. मंडल अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांना दिलेले आहेत.असे आदेश २०१५,२०१६,आणि २०१७ रोजी ग्रामसेवक,तलाठी,मंडल अधिकारी,सरपंच उपसरपंच यांना आदेश दिले आहेत हे आपल्याला माहित आहे का? सामान्य नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे आणि आपले काय हक्क आहेत हे सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे .https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-अज्ञात-गाडी-चालकाकडून-व/
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 द्वारे अधिनियम अंतर्गत होणारी ग्रामविकास कामे रस्ते/ गटर/ समाजमंदिर/ पीक प्रयोग/ पीक संरक्षण/ खताची माहिती/ धान्य अगारे/ अपंग सर्वे/ वयोवृद्ध विधवा सर्वे/ अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती इतर मागासवर्गीय जाती/ दारुबंदी/ अस्पृश्यता नष्ट करणे/ भ्रष्टाचार निर्मूलन/ महिला मुलांच्या संघटना/ शिक्षण प्रसार माध्यमे/ प्रौढ साक्षरता केंद्र/ ग्रंथालये वाचनालय/ ग्रामीण विकास/ वैद्यकीय सेवा साधणे/ सार्वजनिक आरोग्य रक्षण/ लसीकरण सुविधा/ गावातील सार्वजनिक खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकान/ रोगट वस्त्या निवारण/ कचरा व्यवस्थापन/ सार्वजनिक सौचकूप बांधणे/ स्वच्छता सफाई/ दहन भुमी दफन भुमी नियोजन/ बांध पुल बंधारे/ गावरान शेती पडीक शेती उपजाऊ शेती एकरात संख्या/ क्रीडांगण/ सार्वजनिक उपवने/ दिवाबत्ती/ कुटीर उद्योग/ पतसंस्था बहुउद्देशीय संस्था/ गावात पहारा राखण नियोजन/ अग्नीशमन दल/ गावातील लोकसंख्या जन्म मृत्यू विवाह लेखाजोखा/ गावात गोळा होणारा बाजार जत्रा गाडीतळ घरपट्टी पाणीपट्टी अशा विविध माध्यमातून गोळ होणारी रक्कम/ गावात रेशन दुकान संख्या/ गावात पोस्ट आॅफिस/ आपत्ती व्यवस्थापन सुविधा/ महात्मा गांधी स्वयंरोजगार अंतर्गत काम करणारे कामगार संख्या/ झालेली विकास कामे व पुढील नियोजनात असणारी विकास कामे/ विविध बेघर अंतर्गत लाभार्थी संख्या/ विविध घरकुल इत्यादी योजनांची माहिती.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ल्यातील-महाआरो/
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत ग्रामपंचायतीना जनसुविधा विशेष अनुदान
महाराष्ट शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुबंई यांचेकडील शासन निर्णय क्रं ददभू-२०१०/प्र.क्र.६२/ पंरा-६ दि. १६ सप्टेंबर २०१० अन्वये ग्रामीण भागात दहन/ दफनभूमी मध्ये लागणार्या इतर अनुषंगीक सोयी सुविधा पुरविणेबाबत व ग्रामपंचायत कार्यालय भवन बांधकामाबाबत मोठया प्रमाणावर मागणी प्राप्त होत आहे. त्यामुळे सन २०१०-२०११ या आर्थिक वर्षापासून ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान ही नवीन जिल्हास्तरीय योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीमधील सर्वसाधारण जिल्हा योजनेतून निधी उपलब्ध करण्यात येईल. सदर योजना राबविण्याबाबत बाबत शासनाने खालील प्रमाणे मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या आहेत.
योजनेतंर्गत घ्यावयाची कामे
– (अ) ग्रामीण दहन/ दफन भूमीची व्यवस्था करणे, त्या सुस्थितीत ठेवणे व त्याचे नियमन करणेसाठी स्मशानभूमीवर हाती घ्यावयाची कामे
– दहन/ दफन भूमी संपादन
– चबुतर्याचे बांधकाम
– शेडचे बांधकाम
– पोहोच रस्ता
– गरजेनूसार कुंपन व भिती घालून जागेची सुरक्षितता साधणे
– दहन/ दफनभूमीत विद्युत्तीकरण व आवश्यकतेनूसार विद्युत्त दाहिनी/ सुधारीत शवदाहिनी व्यवस्था
– पाण्याची सोय
– स्मृती उद्यान
– स्मशान घाट व नदी घाट बांधकाम (स्मशानभूमी व्यवस्थेसाठी आवश्यक तेवढे)
– जमीन सपाटीकरण व तळ फरशी
– ग्रामपंचायत भवन / कार्यालय याबाबत हाती घ्यावयाची कामेhttps://sindhudurgsamachar.in/breaking-आमदार-नाईक-यांची-एसीबीम/
नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम व इमारती अंतर्गत सुविधा
२) जुन्या ग्रामपंचायत इमारतीची पुर्नबांधणी / विस्तार
३) ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये वृक्षारोपन, परिसर सुधारणा, परिसराला कुंपन घालणे व इतर अनुषंगीक कामे.
: मुंबई जिल्हा (विकास निधीबाबत) नियम १९६० अन्वये प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकास निधी स्थापन करणेत आलेला आहे. सदर निधी स्थायी समिती नियंत्रणाधिन असून निधीचे कामकाज उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) यांचेमार्फत पाहिले जाते.
– जिल्हा ग्राम विकास निधीमध्ये प्रत्येक पंचायतीने प्रत्येक आर्थीक वर्षाचे ३० डिसेंबर पुर्वी ग्रामपंचायतीच्या सर्व स्त्रोतातील उत्पन्नाच्या फक्त ०.२५ टक्के एवढी रक्कम अंशदान म्हणून भरणा करणेत येते. अंशदान रकमेवर ग्रामपंचायतींना २.५ टक्के दराने व्याज आकारुन त्यांचे हिशोबखाती जमा करणेची तरतुद आहे.
जिल्हा ग्राम विकास निधीमध्ये जमा झालेल्या रकमेतुन ग्रामपंचायतींना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ४५ च्या अनुसुची १ मध्ये विहीत केलेल्या विकास कामावरील खर्च भागविणे विशेषतः यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, सामाजिक सभागृह, शाळा खोल्या बांधणे, अंगणवाडी बांधकाम, नळ पाणी पुरवठा योजना सार्वजनिक रस्ते गटारे, सार्वजनिक शौचकुप बांधणे, धर्मशाळा बांधणे इत्यादी. विकासकामासाठी कर्ज मंजुर करता येते. तसेच निधीचे काम करणेसाठी नियुक्त केलेल्या सेवकांचे वेतन व भत्ते लेखन व सामुग्री व तत्सम बाबीसाठी विनियोग करण्यात येतो. कर्ज मंजुर करताना ग्रामपंचायतीची विद्यमान आर्थीक स्थिती व कर्ज परतफेडीची क्षमता विचारात घेऊन प्रस्तावीत कामाचे अंदाजपत्रकीय रकमेच्या ७५ टक्के पर्यंत कर्ज मंजुर करणेत येते जेथे कर्जाची रक्कम ६०,०००/- हून अधिक असेल तेथे कर्ज मंजुरीस जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची पुर्वसंमती असली पाहिजे मात्र जिल्हा परिषद सभेचा कालावधी ३ महिन्याचा असलेने ग्रामपंचायतींनी हाती घेतलेली विकास कामे विहीत वेळेत पुर्ण करणेचे दृष्टीने जि प सर्वसाधारण सभा दिनांक ७.१२.२००४ च्या ठराव क्र २५० नुसार समितीने कर्ज मंजुर करुन जि प सभेत त्यास संमती घेणेबाबत धोरणात्मक निर्णय झालेला आहे.
ग्रामपंचायतीना मंजुर केलेल्या कर्जाची परतफेड वार्षीक २० हप्त्यात व्याजासह करणेची आहे. कर्जाचा व्याजदर द सा द शे ५ टक्के आहे. कर्जाची थकबाकी राहिल्यास २ टक्के दंडनीय व्याज आकारण्यात येते. कर्ज वितरणावेळी ग्रामपंचायतीकडून रु १०० च्या स्टँपपेपरवर सरपंच, उपसरपंच, दोन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांचे स्वाक्षरीने हमीपत्र घेणेत येते.
जिल्हा ग्राम विकास निधीतील शिल्लक रकमा गुंतविणे व पुर्नगुंतवणूक करणेसंबंधीचे अधिकार स्थायी समितीस आहेत. जिल्हा ग्राम विकास निधीतील रक्कम गुंतविणेसंदर्भात शासन निर्देश आहेत.
ग्रामपंचायत विभाग दि.०१/०१/२०१९ रोजीची ग्रामविकास अधिकारी सेवा जेष्टता यादी
विस्तार अधिकारी(पं/एग्राविका) या संवर्गाची दि.०१/०१/२०१९ रोजीची अंतिम सेवा जेष्टता यादी
ग्रामपंचायत कर्मचारी सुधारित सेवा जेष्टता यादी दि.०१/०१/२०१९
दिनांक ०१/०१/२०१९ ची ग्रामसेवकांची अंतिम सेवा जेष्ठता यादी
टूर पॅकेज बाबत एकत्रित दर पत्रक देणेबाबत.
“आमचा गाव आमचा विकास ” (GPDP) उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याबाबत.
ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करावयाच्या धोरणाची अंमलबजावणी
आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत 2019-20 चा ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP)अंतीम करण्याबाबत
14 वा वित्त आयोग जनरल बेसिक ग्रँटच्या सन 2016/17 च्या पहिल्या हप्त्याच्या स्वरुपात (ग्रामपंचायत स्तर) साठी प्राप्त झालेल्या निधीचे पंचायत समिती निहाय परिगणन तपशिल.
14 वा वित्त आयोग जनरल बेसिक ग्रँटच्या सन 2016/17 मधील दुस-या हप्त्यातील रक्कमेस वितरणास झालेल्या विलंबापोटी प्राप्त व्याज,दिनांक 1/4/2017 ते दि. 7/8/2017 अखेर खात्यावर शिल्लक रककमेवरील बॅक व्याज रक्कमेचे परिगणनीत तपशिल.
14 वा केंद्रिय वित्त आयोगातंर्गत सन 2016/17 वित्तीय वर्षात जनरल परफॉर्मन्स ग्रँटच्या स्वरुपात (ग्रामपंचायत स्तर) साठी प्राप्त झालेल्या निधीे मिळण्यासाठी पात्र ग्रामपंचायतींना परिगणन करणेत आलेला तालूका निहाय तपशिल.
14 वा वित्त आयोग जनरल बेसिक ग्रँटच्या सन 2015/16 च्या पहिल्या व दुस-या हप्त्याच्या स्वरुपात (ग्रामपंचायत स्तर) साठी प्राप्त झालेल्या निधीचे पंचायत समिती निहाय परिगणन तपशिल.
14 वा वित्त आयोग जनरल बेसिक ग्रँटच्या सन 2016/17 च्या दुस-या हप्त्याच्या स्वरुपात (ग्रामपंचायत स्तर) साठी प्राप्त झाला आहे.
आपल्या गावात चावडीवर चौकात रोजचं कशातरी कारणावरून मोठ मोठे डिजिटल लागत असतात मग ते वाढदिवसाचे असो. श्रध्दांजली असो. कुणाची कुठेतरी निवडीचे असो. लग्नाचे असो. सिनेमा सर्कस यांचें असो. नेते मंत्री खासदार आमदार यांच्या निवडीचे असो असे डिजिटल रोजच झळकत असतात आणि आपण वेळकाढूण हे सर्व बघतो वाचतो पण त्याचा आपणांस काहीच उपयोग नसतो आणि यामुळे आपणं आपल्या कामांची गोष्ट विसरून जातो तिकडे आपलं लक्ष्य जातच नाही.
प्रत्येक गावातील ग्रामपंचायत. नगरपालिका महानगरपालिका यामध्ये होणारी सर्व विकासकामे ही शासन निधी आणि आपल्या कष्टाचा एक एक रुपया गोळा करून विकस होत असतो. पण कधीही आपणं आपल्या घरासमोर असणारे रस्ते. गटार. बाग बगिचे. अशी अनेक विकस कामे सुरू असतात पण ही चालणारी विकस कामे यासाठी . विकास कामांच्या योजनेचे नाव/ विकास कामांचे क्षेत्र/ विकास कामांसाठी नेमले जाणारे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार याचे नाव पत्ता/ विकास कामांची अनामत रक्कम/ विकास कामांचा चालू आणि पूर्ण कालावधी/ विकास कामांचे दायित्व/ विकास कामावरील खर्च/ विकास कामांचा दर्जा कामांची पध्दत/ असे एक नाही अनेक बाबी तपासणे हे आपले कर्तव्य आहे. पण आपणं ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जे फलकांवर लिहिलं जातं तेच खर मानतो ही आपली चूक आहे.
ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांनी फलकावर जाहीर केलेली कामांची माहिती कालावधी रक्कम कामांचे क्षेत्र व इतर सर्व बाबी आपणं कधी इतर डिजिटल फलक वाचतो बघतो तसं बघितलं आहे कां?? नाही कारण आपणांस काय करायचं त्याचं?? त्याशिवाय ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांची कामे कामांची टेंडर कमी पैशांत घेणारे आणि त्यातूनच निकृष्ट काम करणारे हे चोर मोठेच होणार यात काही शंका नाही?? गावात मजूर सोसायटी असली तरी त्यांच्या हक्काचे काम नेते आमदार खासदार मंत्री यांच्या बगलबच्चे यांनाच मिळणार. म्हणूनच ग्रामपंचायत यांनी लावलेला १४ वा वित्त आयोगाच्या अंतर्गत होणा-या विकास कामांचा फलक लावलेला आहे तो बरोबर आहे कां?? त्याप्रमाणे विकास कामे आपल्या गावात झाली आहेत कां?? हे सर्व पाहण गरजेचे आहे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९