माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश
सावंतवाडी-
सावंतवाडी वैश्यपाडा येथील रहिवासी, सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष व शिवसेना नेते महेश सुकी तसेच प्रभाग क्र. ३ मधील माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या नव्या सदस्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार युवा भाजपा नेते विशाल प्रभाकर परब, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संशोधता लखम सावंत भोसले, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, तसेच प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष लखाराम राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भाजपाचा प्रभाव वाढत आहे. त्याचप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कोकणात खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वामुळे पक्ष अधिक मजबूत होत आहे.
आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला भक्कम यश मिळवून देण्याची जबाबदारी भाजप नेते विशाल परब आणि वेदिका परब यांच्यावर सोपवण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वामुळे शहरात पक्षाची ताकद अधिक वाढेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.


