वेंगुर्ला प्रतिनिधी- शिरोडा-वेळागर येथील समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या राजस्थानमधील युवकाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वेळागर समुद्र परिसरात २०० मीटरवर सापडला. लाईफगार्ड संजय नार्वेकर आणि अजू आमरे यांनी सदर मृतदेह बाहेर काढला.
दस-याच्या दिवशी सावंतवाडी-खासकीलवाडा येथील आठ राजस्थानी कामगार शिरोडा वेळागर येथे समुद्र पर्यटनासाठी गेले होते. यावेळी समुद्रात आंघोळ करताना दोन कामगार बुडाले. यातील सुभाष कुमावत (३०) यांचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर दुसरा कामगार दीनदयाळ राव (२०) हा बेपत्ता होता. वेंगुर्ला पोलिसांनी सदर युवकाला शोधण्यासाठी शिरोडा-वेळागार
येथील राज स्पोर्टच्या सहकार्याने व स्थानिक मच्छीमार, बेपत्ता युवकाचे नातेवाईकांना सोबत घेऊन समुद्रात शुक्रवारी सकाळी शोध मोहीम राबविली. ही शोध मोहीम वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमाकांत दळवी, पोलीस नाईक योगेश राऊळ, कॉन्स्टेबल सुरज रेडकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. शुक्रवारी सायंकाळी वेळागरनजिक २०० मीटर अंतरावर समुद्रात दीनदयाळ राव यांचा मृतदेह लाईफगार्ड संजय नार्वेकर यांना समुद्रात तरंगताना दिसला. सदर मृतदेह समुद्रातून नार्वेकर यांनी बाहेर काढला. त्यांना अजू आमरे यांनी सहकार्य केले. https://sindhudurgsamachar.in/केंद्र-सरकार-देतेय-15-लाख-रु/

