sindhudrg: राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिरात प्रा.वैभव खानोलकर यांनी व्याख्यातून साधला तरुणाईशी संवाद

0
63
प्रा.वैभव खानोलकर यांनी ‘ग्रामीण समाज आणि युवकाची भुमिका‘ यावर विशेष मार्गदर्शन केले.

वेंगुर्ला प्रतिनिधी- आपण ज्या समाजात राहातो, वाढतो त्या समाजासाठी आपण नेहमीच ऋणी रहायला हवे. आपल्या ज्ञानचा कौशल्याचा आणि क्षमतेचा वापर समाजहितासाठी केला पाहिजे असे आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून तरुणाईशी संवाद साधताना त्यांनी आपले विचार मांडले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्हा-व-सत्र-न्यायालया/

वेंगुर्ला-परबवाडा येथे सुरु असलेल्या बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिरात प्रा.वैभव खानोलकर यांचे ‘ग्रामीण समाज आणि युवकाची भुमिका‘ यावर विशेष मार्गदर्शनाचे आयोजन केले होते.  यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.खानोलकर यांनी भरकटत जाणा-या युवापिढी बद्दल तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार याची जाणिव करुन दिली. तर ग्रामीण भागातील विविध समस्यांचा आढावा घेताना अंधश्रद्धा, अज्ञान, अप्रगत शेती, वाढणा-या व्यसनांचे प्रमाण, घटस्फोटांचे प्रमाण, लव्हजिहाद, प्रेमाचे आकर्षण, त्यातून वाया जाणारी तरुणाई, मोबाईलचे वेड, आत्मविश्वासाचा अभाव, भौतिक सुखासाठी चुकीचा मार्ग निवडणे, राजकारण्यांकडून युवाईची होणारी गळचेपी, बेकारी यातून आपले भवितव्य आपल्याच हाती असल्याची जाणिव करुन दिली.

फोटोओळी – प्रा.वैभव खानोलकर यांनी ग्रामीण समाज आणि युवकाची भुमिका‘ यावर विशेष मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here