वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र व परबवाडा ग्रामपंचायत तसेच शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परबवाडा येथे काजू लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण घेण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मदर-तेरेसा-स्कूलमध्ये-प/
संशोधन संचालक संजय भावे, सहभागी संशोधन संचालक डॉ.राजन खांडेकर, उद्यानविद्यावेत्ता डॉ.राजेंद्र भिगार्डे, किटकशास्त्रज्ञ डॉ. विजय देसाई, काजू शास्त्रज्ञ ललित खापरे, मृदा शास्त्रज्ञ डॉ.स्मीता देशमुख, कृषी सहाय्यक जीवन परब यांनी काजू लागवड कशी करावी, कोणती खते व किटकनाशके वापरावी, मृदा परिक्षण का करावे, काजू उत्पादनातून आर्थिक सुलभता कशी मिळेल, वेंगुर्ला काजूमधील कोणत्या जातीच्या काजूची लागवड करावी याबाबत मार्गदर्शन केले. या शिबिराचा लाभ गावातील ५७ ग्रामस्थांनी घेतला.
यावेळी सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच पपू परब, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, कार्तिकी पवार, स्वरा देसाई, अरुणा गवंडे व सूहिता हळदणकर यांच्यासह मनवेल फर्नाडीस, गजानन परब, नरेंद्र नाईक हरिश्चंद्र मांजरेकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटोओळी – संशोधन संचालक संजय भावे यांनी ग्रामस्थांना काजू लागवडीबाबत मार्गदर्शन केले.