वेंगुर्ला प्रतिनिधी- कोकण विभागातून मला मिळालेल्या भरघोस मताधिक्यात सिधुदुर्ग जिह्याचा त्यातही वेंगुर्ला तालुक्याचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे तुमच्या हक्काचा आमदार म्हणून येथील शिक्षकांच्या ज्या काही समस्या, प्रश्न, कामे असतील ती कामे येथील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामार्फत आल्यास ती सर्व कामे निश्चितच पूर्ण करण्यात येतील असे प्रतिपादन कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यनी सत्कारप्रसंगी केले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-पोलिस-ठाणे-हद/
भाजप वेंगुर्ल्याच्यावतीने येथील तालुका संफ कार्यालयात म्हात्रे यांचा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी म्हात्रे यांचे गुरु रमेश जाधव, मुख्याध्यापक संघटना जिल्हाध्यक्ष तर्पे, माजी अध्यक्ष एम.जी.मातोंडकर, कुसगांवकर, एल.आर.पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, महिला तालुकाध्यक्ष स्मिता दामले, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, शीतल आंगचेकर, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, विजय रेडकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, बाळू प्रभू, प्रितेश राऊळ, शरद मेस्त्री, रसिका मठकर, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, महादेव नाईक, अजित राऊळ, वृंदा मोर्डेकर, सुनिल घाग, नितीश कुडतरकर, रमेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
कोकण पदवीधर शिक्षक मतदार संघाचे यापूर्वीचे आमदार कधी या मतदारसंघात फिरकतही नव्हते. मात्र, म्हात्रे हे आमदार आल्यानंतर त्यांची जिल्ह्यात ही दुसरी फेरी असल्याचे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.
फोटोओळी – भाजप वेंगुर्ल्याच्यावतीने येथील तालुका संफ कार्यालयात म्हात्रे यांचा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
[…] १६ वर्षाखालील शालेय व १६ वर्षावरील खुल्या अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. शालेय गटासाठी ‘मराठी भाषेसमोरील आव्हाने‘ किवा ‘मराठीला राजभाषा दर्जाची गरज‘ असा विषय देण्यात आला आहे. स्पर्धकांना विषय सादरीकरणासाठी ५ मिनिटे वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रथम विजेत्या तीन क्रमांकांना रोख रुपये १०००, ७००, ५०० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना पत्येकी ३०० रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.http://sindhudurgsamachar.in/sindhudugr-शिक्षकांच्या-समस्या-प… […]