sindhudugr News: नाट्यमहोत्सवात सहभागी दशावतार नाटक मालकांचा खास गौरव

0
50
नाट्यमहोत्सवात सहभागी दशावतार नाटक मालकांचा खास गौरव

वेंगुर्ला प्रतिनिधी- ग्रामीण भागात लोकवस्तीपासून लांब निरव शांतता असलेल्या भागात प.पू. दादा पंडीत यांनी परमेश्वरी संकेतानुसार व अध्यात्मिकतेच्या प्रचारासाठी तसेच भाविकांना मनःशांती लाभणा-या अशा श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानची केलेली निर्मिती ही एक सेवा आहे. या ठिकाणी आलेल्या भाविकांना समाधान लाभते. भाविकांत अध्यात्मिकतेची प्रेरणा व देवभक्ती वाढविण्यासाठी या स्थळावर करीत असलेले उपक्रम याची खरी गरज आजच्या काळात आहे. असे पतिपादन मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प.पू.कौस्तुभबुवा रामदासी यांनी खानोली-सुरंगपाणी येथील दशावतार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-निर्भया-निधीतील-वाहने/

खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान या धार्मिक स्थळावर दत्तजयंती निमीत्त आयोजित केलेल्या नाट्यमहोत्सवात सहभागी झालेल्या सर्व दशावतारी नाट्यमंडळाच्या मालकांचा मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प.पू.कौस्तुभबुवा रामदासी यांच्या प्रमुख उपस्थितीत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळातील कलाकार कै. शांती कलिगण यांच्या स्मरणार्थ शालश्रीफळ, सन्मानपत्र व पुषगुच्छ देवून खास श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान कामटीचे व्यवस्थापक प.पू.दादा पंडित यांनी गौरव केला.

दत्तजयंती महोत्सव दि. ३० नोव्हेंबर ते ८ डिसेंबर कालावधीत नाट्य महोत्सवात सहभाग घेतलेल्या चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवणचे मालक देवेंद्र नाईक, श्री महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडीचे मालक भाई शिर्के, खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोलीचे मालक बाबा मेस्त्री, वालावलकर दशावतार नाट्य मंडळ वालावलचे मालक नाथा नालंग, जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोसचे मालक शरद मोचेमाडकर, आजगांवकर दशावतार नाट्य मंडळ, आजगांवचे रमेश आजगांवकर, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूरचे मालक भाई कलिंगण, बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठीचे मालक दिनेश गोरे, आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवलीचे मालक भाऊ आरोलकर आदी दशावतार मंडळाच्या मालकांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांत मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प.पू.कौस्तुभबुवा रामदासी, मालवणचे उद्योजक दत्ता सामंत, तळवडे येथील उद्योजक राजाभाऊ गावडे, वेंगुर्लेतील उद्योजक दिगंबर नाईक, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी रविंद्र तांबोळकर, जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव देवयानी वरसकर, संजय वेंगुर्लेकर, भाऊ पोतकर, देवगडचे मनिष कुबल आदींचा समावेश होता. तसेच गोवा व सिंधुदुर्गातील भाविक मान्यवर उपस्थित होते.

 या संपुर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन नेरूरचे राजा सामंत यांनी उकृष्ठपणे केले. तर आभार पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडीत यांनी मानले.

फोटोओळी-वेंगुर्ले.खानोली-सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतनात आयोजित दशावतारी नाट्यमहोत्सवातील कलेश्वर दशावतारी मंडळ नेरूरचे मालक भाई कलिंगण यांचा दशावतारी कलावंत स्व. शांती कलिंगण स्मरणार्थ शालश्रीफळपुष्पहार व सन्मानपत्र देवून देवस्थावनचे व्यवस्थापक प.पू. दादा पंडीत यांनी गौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here