Sindhudurg:डॉ.राधा कृष्ण वेतोरकर यांच्या प्रामाणिक पणाचे वेतोरे पंचक्रोशीतून होतेय कौतुक

2
309
डॉ.राधा कृष्ण वेतोरकर यांच्या प्रामाणिक पणाचे वेतोरे पंचक्रोशीतून होतेय कौतुक

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

वेंगुर्ले – वेंगुर्लेवेतोर येथील सातेरी मंदिर येथे देवदर्शनासाठी आलेल्या सावंतवाडी येथील निखिल सावंत यांचे मंदिर परिसरात पडलेले पाकीट डॉ. राधाकृष्ण वेतोरकर यांनी सात हजार रोख रक्कम व महत्त्वाच्या कागदपत्रांसह प्रामाणिकपणे सातेरी मंदिरात मध्ये पाकीट मालकाला सुपुर्द केले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सामाजिक-कार्यासाठी-नू/

सावंतवाडी येथील निखिल सावंत हे वेतोरे येथील सातेरी मंदिर येथे देवदर्शनासाठी आले असता त्यांची रोख रक्कम सात हजार रुपये व महत्त्वाच्या कागदपत्रांसह मंदिर परिसरात पाकीट पडले.व ते पाकीट येथे आलेले डॉ. राधाकृष्ण वेतोरकर यांना सापडले असता, त्या पाकीटात असलेल्या कागदपत्रांच्या आधारे पाकीट मालकाशी संपर्क करुन पाकीटामध्ये असलेली सात हजार रोख रक्कम व महत्त्वाच्या कागदपत्रांसह वेतोरे येथील सातेरी मंदिर येथे पाकीट मालक निखिल सावंत यांच्या ताब्यात देण्यात आले.त्यामुळे डॉ.राधाकृष्ण वेतोरकर यांच्या प्रामाणिक पणाचे वेतोरे पंचक्रोशीतील कौतुक केले जात आहे.