वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर महाविद्यालयात इंद्रधनु सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा घेण्यात आली. याचे उद्घाटन प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांच्या हस्ते झाले.https://sindhudurgsamachar.in/सावंतवाडीचा-सुपुत्र-निला/
यावेळी महोत्सव समितीचे चेअरमन डॉ.प्रा.आनंद बांदेकर, सुरेंद्र चव्हाण, स्टाफ सेक्रेटरी प्रा.देवदास आरोलकर, ज्येष्ठ शिक्षक बी.बी.जाधव, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक दिलीप शितोळे, महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.डी.बी.राणे, सहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम.भैरट, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.सदाशिव भेंडवडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.वामन गावडे, प्रा.सचिन परुळकर, विद्यार्थी प्रतिनिधी प्रज्वल पालव, विद्यार्थीनी प्रतिनिधी गंगा वालावलकर व श्रेयस परब उपस्थित होते. कॉलेज जीवनात स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांमध्ये स्नेह दृढ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देणारे व विविध कला गुणांचा अविष्कार सादर करण्याचे एक व्यासपिठ असल्याचे प्राचार्य देऊलकर यांनी सांगितले.
[…] […]