Sindhudurg:बेकायदा दारु वाहतूकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई

0
73
शहरामध्ये चालू असलेले अनैतिक धंदे तात्काळ ८ दिवसात बंद करा ; मनसे ची मागणी
शहरामध्ये चालू असलेले अनैतिक धंदे तात्काळ ८ दिवसात बंद करा ; मनसे ची मागणी

ओरस– ओरस येथे कंटेनर सह(एमएच १२ आरएन ४४०३) असा एकूण ६० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.. – सिंधुदुर्गनगरी- गोव्यातून मुंबईकडे केल्या जाणार्‍या बेकायदा दारु वाहतूकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाने आज सकाळी ओरोस येथे कारवाई केली. या कारवाईत ४८ हजार दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दारुसह दारु वाहतुकीसाठी वापरलेला कंटेनर (एमएच १२ आरएन ४४०३) असा एकूण ६० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी हाशीम कासम शेख (६१, रा. सांताक्रुझ मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १ हजार दारुचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.सदर कारवाई विभागीय उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी यांच्या आदेशान्वये निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, काँस्टेबल अमोल यादव, विलास पवार, सुशांत बनसोडे, दीपक कापसे व योगेश शेलार यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here