Sindhudurg: आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा स्पोर्टेक्स 2022 आयोजन

0
319
रत्नागिरीत समाजकल्याण जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित.
रत्नागिरीतसमाजकल्याण जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित.

ओरोस: आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा स्पोर्टेक्स 2022 आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, किर्लोस संचलित छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय किर्लोस- ओरोस सिंधुदुर्गनगरी ,नवनगर विकास प्राधिकरण ओरोस पोलीस मैदान सिंधुदुर्गनगरी येथे आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा स्पोर्टेक्स 2022 आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन दिनांक 7 ते 8 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/केंद्र-सरकार-देतेय-15-लाख-रु/

कार्याक्रमाचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोसचे अध्यक्ष (माजी खासदार) ब्रिगे.सुधीरजी सावंत आहेत. विशेष अतिथी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम डॉ. बाहासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. व्ही. जी. नाईक, आहेत. कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर,पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, जिल्हा कृषी अधिक्षक डि.एस. दिवेकर,उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता पी.सी.हळदवणेकर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी.एन. सावंत उपस्थित रहणार आहेत. स्पोर्टेक्स 2022 चे पारितोषिक वितरण व सांगता समारंभ शनिवार दि.8 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालाचे प्राचार्य योगेश अनंत पेडणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र कृष्णा सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रदिप नामदेव सावंत यांनी कळविले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्ह्यातील-नवउद्योजक/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here