Sindhudurg: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष जाधव यांचे निधन.

0
169
सुभाष जाधव

वेंगुर्ला.प्रतिनिधी

वेंगुर्ला आनंदवाडी येथील रहिवासी फुले आंबेडकर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते तथा कृषी खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष राघोबा जाधव.(वय ६५)  यांचे २८ रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. https://sindhudurgsamachar.in/श्री-साईमंदिर-वेतोरे-१७-व/

सुभाष जाधव हे वंचित बहुजन आघाडी वेंगुर्ला तालुका संघटक, बौद्ध हितवर्धक महासंघ सदस्य, दलित समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच १९७० पासून जवळपास ५० वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय चळवळीत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष  सहभाग होता.नेहमीच तळागाळातील कार्यकर्त्या बद्दल त्यांना आपुलकी होती. त्‍यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, भाऊ, बहीण, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.देवगड  न्यायालयातील अव्वल कारकून जयंत जाधव यांचे ते भाऊ होत.

फोटो  सुभाष जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here