Sindhudurg: आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

0
99
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

वेंगुर्ला प्रतिनिधी – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, नागरी संरक्षण दल सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग विद्यानिकेतनच्या प्रांगणात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पत्रकारिता-कोश-2023-चा-प्/

    या कार्यशाळेत जिल्हा आपती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंतनागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनिबंधक अतुल जगतापप्रशात कांबळेसंकटकालीन बचाव प्रशिक्षणाचे निरिक्षक आनंद परब यांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आपत्ती व त्यांचे सुनियोजित व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी भूकंप आणि आग या आपत्तींचा सुनियोजित पद्धतीने सामना करण्यासाठी संकटकालीन बचाव प्रशिक्षण देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशिक्षित आपदा मित्रांनी या कार्यशाळेसाठी सहकार्य केले.

फोटोओळी – सिंधुदुर्ग विद्यानिकेतनच्या प्रांगणात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दाखविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here