वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ५ मार्च रोजी झाराप-कुडाळ येथील हॉटेल आराध्य येथे होणार आहे. तर ५ व ६ मार्च या कालावधीत काजू उद्योगाला लागणा-या सर्व मशिनचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-पत्रकार-वारीशे-हत्या-प्/
महाराष्ट्र कॅश्यू मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ७ फेब्रुवारी २०२३ रोजी सह्याद्री अतिथी गृहावर प्रत्यक्ष भेट घेऊन परतावा योजनेतील तक्रारी त्वरित दूर करण्याचे व येणा-या बजेटमध्ये काजू उद्योगाला ५ टक्के व्याज सवलत विचारपूर्वक देण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या सर्व उद्योगांनी महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनचा सदस्य बनून शासनाचे मिळणारे फायदे मिळवण्यासाठी एका छताखाली येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील काजू उद्योजक मोठ्या संख्येने असोसिएशनमध्ये एकत्र झाल्याशिवाय शासन त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून नवीन योजना मिळवणे, रोजगार यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देणे, काजू लागवड वाढविण्यास प्रोत्साहन देणे अशी बरीच ध्येय घेऊन असोसिएशन कार्य करीत आहे. म्हणून छोट्या मोठ्या सर्व उद्योगांना ५ मार्च २०२३ च्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व काजू उद्योगाला लागणा-या सर्व मशिनरींचे प्रदर्शन बघण्यासाठी व दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेऊन परतण्यासाठी नाममात्र फी आकारून प्रवेश देण्यात येणार आहे.
तसेच यावेळी गोवा कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन अध्यक्ष, कर्नाटक कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन अध्यक्ष व कर्नाटक राज्यातील इम्पोर्ट व एक्सपोर्ट करणारे नामवंत उद्योजक उपस्थित राहणार आहेत. यासाठी काजू उद्योगाशी निगडित, काजू उद्योजक व नवीन काजू व्यवसाय चालू करण्याची इच्छा असणा-यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.


