Sindhudurg: कीड आणि रोगांच्या व्यवस्थापनासाठी अॅप्स आणि वेबसाईटची निर्मिती

0
54
कीड आणि रोगांच्या व्यवस्थापन

वेंगुर्ला प्रतिनिधी- पोषक तत्त्वांच्या कमतरते व्यतिरिक्त त्यांच्या पिकांवर परिणाम करणा-या कीड आणि रोगांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शेतक-यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असते. या पार्श्वभूमीवर भारतीय कृषी संधोधन परिषद अंतर्गत काजू संशोधन संचालनालय पुत्तूर यांनी काजू पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित अॅप्स आणि वेसाईटची निर्मिती केली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शेतकऱ्यांची-वीज-तोडणी-ब/

 वेबसाईट व अॅपवर अपलोड केलेल्या प्रतिमांमधून त्वरित सुमारे ६० काजू२० रोग आणि १० अन्नद्रव्ये तत्वांची कमतरता यांचे निदान करु शकता. यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन काजू सुरक्षा अॅप (कॅश्यू प्रोटेक्ट अॅप) डाऊनलोड करावयाचा आहे. त्यानंतर आपले नावपत्तामोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकून नोंदणी करावी. हे अॅप ११ प्रादेशिक भाषेत असून आपल्याला हव्या असलेल्या भाषेचा वापर करु शकता. येथे आपण मोबाईलद्वारे काढलेले फोटो अपलोड करुन आपल्या बागेत असणा-या कीडरोग व पोषण कमतरतेच्या अभाव यांचे निदान करु शकता. यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्रवेंगुर्ला येथील कीटक शास्त्रज्ञ व हॉर्टसॅप काजू प्रकल्प अन्वेषकडॉ.विजयकुमार देसाई व संशोधन सहयोगी हॉर्टसॅप प्रकल्पाचे डॉ.गोपाळ गोळवणकर यांनी राज्यातील काजू उत्पादक शेतक-यांनी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले आहे.

दरम्यानहे अॅप्स आणि वेबसाईट वापरकर्त्यांना काजू लागवडीच्या समस्यांचे कुशलतेने व्यवस्थापन करण्यास सक्षम करेलज्यामुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here