Sindhudurg: गडनदी तसेच तेरेखोल नदीच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा

0
102
गडनदी तसेच तेरेखोल नदीच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा
गडनदी तसेच तेरेखोल नदीच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग:-जिल्ह्यातील गडनदी तसेच तेरेखोल या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.गड नदीच्या क्षेत्रात येणाऱ्या कणकवली तालुक्यातील कलमठ, वरवडे, फणसनगर आणि मालवण तालुक्यातील मसुरे, मर्ड, बांदिवडे बुद्रुक तर तेरेखोल नदीच्या क्षेत्रात येणाऱ्या इन्सुली, बांदा, शेर्ले, तळवडे, आरोंदा, किनळे, कवठणी, सातार्डा, सातोसे या गावांतील नागरिकांनी दक्षता यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-जिल्ह्यातील-2/

तेरेखोल नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. पुराच्या पाण्यात जावू नये. आपत्कालीन स्थितीत जिल्हा नियंत्रण कक्षाच्या (०२३६२)२२८८४७/१०७७ तसेच तालुका नियंत्रण कक्षाच्या (०२३६३) २७२०२८ या क्रमांकाशी संपर्क साधाव गड नदीच्या पाणी पातळी त वाढ होत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी.पुराच्या पाण्यात जावू नये. आपत्कालीन स्थितीत जिल्हा नियंत्रण कक्षाच्या (०२३६२) २२८८४७/१०७७ तसेच तालुका नियंत्रण कक्षाच्या कणकवली करीता (०२३६७) २३२०२५ आणि मालवण करिता (०२३६५) २५२०४५ या क्रमांकाशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here