वेंगुर्ला प्रतिनिधी- जलजीवन मिशन अंतर्गत अणसूर गावसाठी ‘हर घर जल‘ योजनेचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रथमेश तेली, मनवेल फर्नांडीस, मच्छिमार संघटनेचे वसंत तांडेल, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.https://sindhudurgsamachar.in/आदिवासी-महिलेला-विवस्त्र/
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर गावडे, संयमी गावडे, प्रज्ञा गावडे, सीमा गावडे, साक्षी गावडे, वामन गावडे, ग्रामसेवक सद्गुरु गावडे, ग्रामस्थ महादेव गावडे, बिटू गावडे, चंद्रकांत गावडे, देऊ गावडे, मंजुषा मालवणकर, प्रदिप राणे, उदय गावडे, योगेश गावडे, रत्नेश गावडे, किशोर परब, चंद्रकांत मुळीक, नारायण ताम्हणकर, गजमुख गावडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
फोटोओळी – राजन तेली यांनी हर घर जल योजनेचा शुभारंभ केला.