
वेंगुर्ला प्रतिनिधी-वेंगुर्ल्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव व उपाध्यक्षपदी देवेंद्र जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-डिस्ने-स्टारवर-ट/
आनंदवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची सभा जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष अमोल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत सन २०२३ ते २०२४ या वर्षासाठी नविन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली. यात अध्यक्ष-किरण जाधव, उपाध्यक्ष-देवेंद्र जाधव, सचिव-अमोल जाधव, सहसचिव-गौतम जाधव, मोनाली जाधव, खजिनदार-श्रेयस जाधव, सहखजिनदार-सुभाष जाधव, कार्याध्यक्ष-काव्या जाधव, विणा जाधव, सल्लागार-वाय.जी.कदम, गजानन जाधव, लक्ष्मण जाधव, सुरेश जाधव, सुवर्णा जाधव यांचा समावेश आहे.
फोटो – किरण जाधव, देवेंद्र जाधव

