वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील हिदू धर्माभिमानी नागरिकांतर्फे रामनवमीचे औचित्य साधून ३० मार्च रोजी मारुती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्र पठण ही तालुकास्तरीय स्पर्धा रामेश्वर मंदिर स्टॉप नजिकच्या भाऊ मंत्री यांच्या राममंदिरात सायंकाळी ४ वाजता घेण्यात येणार आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudugr-काजू-लागवडीबाबत-ग्रामस/
दुसरी ते चौथीने मारुती स्तोत्र व पाचवी ते सातवीने रामरक्षा स्तोत्र पठण करावयाचे आहे. विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल. इच्छुकांनी अजित राऊळ (९०२११७०१४६) किवा अॅड.सुषमा प्रभूखानोलकर (९४०४१६३५७४) यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन अरुण गोगटे व अजित राऊळ यांनी केले आहे.