Sindhudurg: नांगरतास येथे गवा रेड्यांचा धुमाकूळ

1
49
नांगरतास येथे गवा रेड्यांचा धुमाकूळ

अशोक गावडे यांच्या ऊस आणि मका पिकाचे केले नुकसान;पाच एकर क्षेत्र केले जमीनदोस्त

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

आंबोली-: येथील नांगरतासवाडी येथील अशोक सखाराम गावडे यांच्या ४ एकर उसशेतीचे आणि १ एकर मक्याचे नुकसान गवारेड्यानी केले.या भागात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे मात्र वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही.केवळ तात्पुरते एखाद्या वेळी येऊन पंचनामा केला जातो मात्र कागदपत्र पूर्तता आणि नुकसान भरपाई दिली जात नाही भीक नको पण कुत्रे आवर या उक्तीप्रमाणे गव्याना आवर असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.येथील चंद्रकांत पाताडे यांच्या देखील उसशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-ठाकरे-गटाचे-उरलेले-१५-आम/

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here