Sindhudurg: परुळेबाजार येथे ‘आनंदाचा शिधा‘ वाटप

0
66
परुळेबाजार येथे ‘आनंदाचा शिधा‘ वाटप
परुळेबाजार येथे ‘आनंदाचा शिधा‘ वाटप

वेंगुर्ला प्रतिनिधी- परुळेबाजार येथील धान्य दुकानातुन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते नुकताच आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने गुढीपाडवा सणानिमिताने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र काही कारणास्तव विलंब झाला. दरम्यान, आता आनंदाचा शिधा प्राप्त झाल्याने त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडा सरपंच तथा चेअरमन निलेश सामंत, व्हाईस चेअरमन प्रसाद पाटकर, ग्रामपंचायत सदस्य  प्रदिप प्रभू, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, पुनम परुळेकर, सचिन देसाई, सोसायटी सेल्समन जयवंत राऊळ, बाबू घोगळे,  तलाठी  मिलिंद कुडतरकर, व ग्रामस्थ उपस्थित होते. १०० रुपयात आनंदाचा शिधा प्राप्त झाल्याने शिधापत्रिकाधारकांकडुन समाधान व्यक्त होत आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्हास्तरीय-निबंध-स्प/

फोटोओळी – शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here