वेंगुर्ला प्रतिनिधी- मूळ भारतीय व ब्राझिल येथील किप दी बॅल रोलिग तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेचे संस्थापक विजय बावसकर व दीपाली बावसकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी कोकणातील वाया जाणारा काजू बोंडू ब्राझिलच्या धर्तीवर उपयोगात आणण्यासाठी काय करता येई यासंदर्भात येथील शास्त्रज्ञ, काजू कारखानदार व काजू उत्पादक यांच्याशी चर्चा केली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-तालुका-पत्रक-3/
बावसकर यांनी येथील वाया जाणा-या काजू बोंडूपासून काजू वाईन, काजू पल्प, काजू ज्यूस, नेक्टर व काजू बोंडूच्या चोथ्यापासून जनावरे, पक्षी यांच्यासाठी खाद्य तयार केल्यास येथील ९५ टक्के काजू बोंडू वापरात येऊन त्यातून काजू उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. काजू बोंडूपासून उच्च दर्जाची उत्पादन घेण्यासाठी काढणी व हाताळणी योग्यप्रकारे केली पाहिजे. फळ संशोधन केंद्रात असलेल्या चार प्रयोगशाळा या ब्राझिल येथे असलेल्या प्रयोगशाळांच्या तोडीच्या आहेत. त्याचा उपयोग काजू उत्पादक शेतक-यांनी करुन घेतला पाहिजे असे स्पष्ट केले.
यावेळी वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.राजन खांडेकर, उद्यानवेता डॉ.महेंद्र गव्हाणकर, रोहा येथील काढणी पश्चात अभियांत्रिकी विभागाचे डॉ.श्रीकांत स्वामी, प्रा.प्रकाश रेळेकर, आंबा-काजू बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, बिपिन वरसकर, राजन पोकळे, उमेश येरम, अस्मिता एम.जे., फळ संशोधन केंद्र वेंगुर्ल्याच्या डॉ.स्मिता देशमुख, डॉ.एम.पी.सणस, ललित खापरे, डॉ.संजय चव्हाण, ए.जी.साटेलकर आदी उपस्थित होते.
फोटोओळी – विजय बावसकर व दीपाली बावसकर यांनी शास्त्रज्ञ, काजू कारखानदार व काजू उत्पादक यांच्याशी चर्चा केली.