जलजीवनच्या भूमीपूजनला आलेल्या निलेश राणेंना एका व्हाळावरच नारळ फोडून फिरावे लागले मागे
भडगाव – भडगाव खुर्द गावामध्ये निलेश राणे येणार व जलजीवन मिशन नळयोजना, ब्राम्हणवाडी रस्ता यांची भूमिपूजन करणार असल्याची जाहिरात शनिवारी गावातील राणे समर्थक मंडळींकडून करण्यात आली. वस्तुस्थिती अशी की जलजीवन मिशनची विहीर ही शिवसेनेच्या पाठपुराव्यातून तसेच आमदार वैभवजी नाईक यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच ब्राम्हणवाडी रस्ता कामासाठी बजेट मधून आमदार वैभवजी नाईक यांनीच ९ लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. असे असताना खोटं बोलण्याच्या राणे समर्थकांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे हे काम आम्ही मंजूर केले असे भासवत कामाच्या भूमीपूजनाचा घाट घालण्यात आला होता.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एच३एन२-फ्ल्यू-संदर्भा/
कामांच्या मंजुरीसाठी निलेश राणे यांचा काहीही संबंध नसताना या कामाचे ते भूमिपूजन करणार म्हटल्यावर गावातील शिवसैनिक एकवटले व मंदिरासमोर भूमिपूजन होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला.निलेश राणेनी ग्रामस्थांची मनधरणी कराण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी शिवसैनिकांसमोर आपला निभाव लागणार नाही हे लक्षात येताच राणेंना घेऊन आलेल्या गावातील ५, ६ कार्यकर्त्यांनी भूमिपूजनाचे नियोजित स्थळ बदलून ज्या ठिकाणी नळ योजनेचा काहीही संबंध नाही अशा एका व्हाळावर बॅनर लावून राणेंच्या हस्ते नारळ फोडून घेतला.



[…] मुंबई – विधानसभा अधिवेशनात कोकणातील आमदारांनी मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाबाबत लक्षवेधी मांडल्याने मुंबई मंत्रालय येथे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून महामार्गाच्या अनेक प्रलंबित कामांकडे लक्ष वेधले.संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत सिंधुदुर्गातील टोल सुरु करू नये. सिंधुदुर्ग वासियांना टोल माफी मिळावी. अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी ना. रविंद्र चव्हाण व राष्ट्रीय महामार्गाच्या दिल्ली येथील अधिकाऱ्यांकडे केली. तसेच आज मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नाबाबत विधानसभा अधिवेशनात लागलेल्या लक्षवेधीतही आ.वैभव नाईक टोल प्रश्नी आवाज उठविला. त्यावर ना. रविंद्र चव्हाण यांनी सकारात्मकता दर्शविली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-भडगावात-शिवसेनेने-दाख… […]