Sindhudurg: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला वाढदिवस भोगवेत मनवला!

1
169
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला वाढदिवस भोगवेत मनवला
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला वाढदिवस भोगवेत मनवला

वेंगुर्ला प्रतिनिधी

क्रिकेटचा देव देवभूमी कोकणात, ब्लू फ्लॅग नामांकन मिळालेल्या भोगवे समुद्र किनाऱ्यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी  भोगवेत दाखल झालेत आज त्याचा ५० वा वाढदिवस त्याच्या चाहत्यांनी साजरा केला तर वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी सचिन तेंडुलकर याचे वाळूशिल्प भोगवे किनाऱ्यावर साकारले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-ब्राझिल-येथील-बावसकर-दा/

वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी सचिन तेंडुलकर याचे वाळूशिल्प भोगवे किनाऱ्यावर साकारले.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात भोगवे  येथे दाखल झाला आहे. आपला वाढदिवस भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करणार आहे. सचिन मित्रांसमवेत गोवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला असून भोगवे किनारी फेरफटका मारला.

प्रथमच सचिन आपल्या ५० व्या  वाढदिवसानिमित्त मित्रांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला आहे. भोगवे येथील समुद्रकिनारी एक पंचतारांकित हॉटेल्स असून या हॉटेलमध्ये यापूर्वी अनेक अभिनेते तसेच क्रिकेटपटू ही येऊन गेले आहेत. सचिनचा संपूर्ण भारतभर वाढदिवस साजरा होत आहे आज त्याच्या चाहत्यांनी भोगवेत साजरा केला

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here