Sindhudurg: राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा

0
54

वेंगुर्ला प्रतिनिधी- येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय निवासी शिबिर परबवाडा येथे पार पडले. यावेळी नजिकच्या कणकेवाडी येथील बंधारा बांधण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकर घेत ग्रामस्थांच्या मदतीने तो पूर्णत्वास नेला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-शालेय-बाल-महोत्सवाचे-उद/

      बंधारा पूर्णत्वास नेण्यासाठी परबवाडा उपसरपंच पपू परब, सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, सुहिता हळदणकर, माजी सदस्य संजय माळगांवकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल परब, प्रमोद नाईक, जीवन परब, नाना राऊळ, विश्वास पवार यांच्यास ग्रामस्थ, प्राध्यापक व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

फोटोओळी – परबवाडा-कणकेवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी बंधारा बांधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here