सावंतवाडी – सावंतवाडी वनविभागाचे सेवानिवृत्त वनपाल चंद्रकांत साबाजी गावडे आंबोली गेळे वय ६६ यांचे आज पहाटे ३.०० वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झाले.
आठ दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने गोव्याच्या मणिपाल मध्ये दाखल करण्यात आले होते. काल सोमवारी त्यांच्यावर बायपासची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी कणकवली , कुडाळ , तरळे, दोडामार्ग येथे ३४ वर्ष सेवा बजावली होती. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-विविध-क्षेत्रातील-व्यक/
त्यांच्या मागे पत्नी , ४ मुली , जावई , नातवंडे , पुतणे, पुतण्या , भाचे , भाच्या आहेत. ओरोस सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिपरीचारिका सौ. श्रीप्रिया धुरी यांचे वडील तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसेविका सौ. प्राची राणे यांचे ते काका होत. आंबोली गेळे येथे आज सकाळी 11च्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.