वेंगुर्ला प्रतिनिधी- वायंगणी-पंडितवाडी लगतच्या चोरव्हाळी माळरानावरील उत्पन्न देणारी सुमारे ३५ काजू कलमांसहीत आंबा व जंगली झाडे आगीत जळून सुमारे ३ लाख रुपयाचे नुकसान झाले. सदरची आग वेंगुर्ला नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने विझविल्यामुळे लगतच्या बागायतीचे नुकसान टळले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ल्यात-सर्वस्तर/
वायंगणी ग्रामपंचायतीनजीक पंडितवाडीलगतच्या भेंणयाम माळरानावरील मंदा खानोलकर, पुष्पा खानोलकर, इंदुमती खानोलकर यासह अन्य शेतक-यांच्या काजू आणि इतर जंगली झाडे असलेल्या बागेस रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लागल्याचे ग्रामस्थाने पाहिले. त्यानुसार स्थानिक पपू धोंड, आप्पा धोंड, बाबा पंडित, सिद्धेश सावंत, सत्वशील परब, अर्जुन पंडित, श्रीधर पंडित, रविद्र पंडित, सागर मोघे, साईल पंडित, नाना पंडित, विजय वेंगुर्लेकर यासह २५ ग्रामस्थांनी बादल्या, कळश्यांच्या साहय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी सुमन कामत यांनी याबाबत माहिती वेंगुर्ला पोलीस स्टेशनला दिली व अग्निशमन पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार वेंगुर्ला नगर परिषदेचा अग्निशामक तात्काळ दाखल झाला. तासाभरात सदरची आग विझविण्यात यश आले. मात्र, सुमारे ३५ हून जास्त काजू कलमे आगीच्या मध्यस्थानी पडून सुमारे आग तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा राज्य शासनाचे कर्मचारी संपावर गेल्याने झालेला नाही.
फोटोओळी-वायंगणी-पंडितवाडी येथील भेंणयाम माळरानावरील काजू बागेस लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली फळांनी बहरलेली काजू कलमे.


