वेंगुर्ला प्रतिनिधी- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच परुळेबाजार ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर यांनी त्यांचे स्वागत केले. परुळेबाजार गावाला भेट द्यायला मला नेहमीच आवडते. काही समस्या असल्यास जरुर कळवा. मी त्या सोडविण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दीपक केसरकर यांनी दिले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-परुळेबाजार-येथे-आनंदा/
यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी मोहन भोई, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप प्रभू, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, पुनम परुळेकर, ग्रामसेवक शरद शिदे, सचिन देसाई, स्वीय सचिव योगेश तेली व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
फोटोओळी-दीपक केसरकर यांनी परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर सरपंच प्रणिती आंबडपालकर यांनी त्यांचे स्वागत केले.