Sindhudurg: सायली गावडे खूनप्रकरणी जामीन नाकारला

0
56

वेंगुर्ला प्रतिनिधी- मठ-कणकेवाडी येथील सायली गावडे या युवतीचा खून केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी गोविंद उर्फ वैभव दाजी माधव (३८) रा. परुळे याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी नामंजूर केला आहे. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई, तर फिर्यादीतर्फे अॅड. अजित भणगे, अॅड. मिहीर भणगे, अॅड. सागर ठाकुर, अॅड. सुनील मालवणकर, अॅड. स्वप्ना सामंत यांनी काम पाहिले.

 मठ-कणकेवाडी येथील रहिवासी आणि कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात नर्सिंग असिस्टन्टचे प्रशिक्षण घेणा-या सायली यशवंत गावडे या २० वर्षीय युवतीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना २८ ऑगस्ट २०२२ रोजी उघडकीस आली होती. हा खून सायलीच्या मैत्रिणीचा पती गोविंद उर्फ वैभव दाजी माधव याने केल्याचे वेंगुर्ला पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. सद्यस्थितीत तो न्यायालयीन कोठडीत आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आंतरमहाविद्यालयीन-क्र/

दरम्यान, संशयित आरोपीने सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. यावरील सुनावणीत बाजू मांडताना संशयित आरोपीने मयत सायली हीला आडेली-सडा येथे घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेजमधून निष्पन्न झाले असून तिच्या अंगावर जखमा असल्याचे दिसून येत असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आली. तसेच मयत सायलीचे सीमकार्ड आपल्या मोबाईलमध्ये वापरुन संशयिताने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. वडखोल येथे जातो असे सांगूनही तो तिकडे गेला नाही, हे मुद्देही प्रकर्षाने न्यायालयासमोर मांडण्यात आले. सरकार पक्ष वकीलांचा हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने संशयिताचा जामीन अर्ज फेटाळून लावला.https://sindhudurgsamachar.in/sindhudrg-बुडून-बेपत्ता-झालेल्या/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here