शिरगाव, ( वार्ताहर)
देेवगड तालुक्यातील केंद्र शाळा साळशी नंबर १ याप्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. केंद्र शाळा साळशी नंबर १ या प्रशालेतील सन २०१९ ते २०२१ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी ते सातवी मधील वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, तसेच गणित व इंग्लिश यविषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना,तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देवून गौरविण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-हापूस-आंबा-थेट-विक्री-कर/
तसेच ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा, सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परिक्षा,इंडियन टॅलेंट सर्च परीक्षा या स्पर्धा परीक्षेत जिल्हास्तरीय व राज्यस्तरावर विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले.तसेच रंगोत्सव सेलिब्रेशन मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सरपंच वैशाली सुतार उपसरपंच कैलास गावकर ग्रामपंचायत सदस्य विशाखा साळस्कर ,आदिती रावले, पांडुरंग मिराशी, पूनम मणचेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर, माजी सरपंच सुनील गावकर , अनिल पोकळे, किशोर साळसकर, सत्यवान सावंत, देवस्थान विश्वस्त समितीचे चेअरमन योगेश मिराशी,माजी उपसरपंच राजेंद्र साटम , माजी ग्रा.प. सदस्य धााकू गावकर ,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिलीप गावकर, किशोर लाड,सुजाता मिराशी,केंद्रप्रमुख वर्षा लाड केंद्र मुख्याध्यापक गंगाधर कदम आदी उपस्थित होते.
गंगाधर कदम यानी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली व आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मराठे यांनी केले.रात्री मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पार पडले यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.