Sindhudurg: २० मे पर्यंत अणाव घाटचेपेड पुलाच्या स्लॅबचे काम ठेकेदाराने पूर्ण न केल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

0
149
अणाव घाटचेपेड पुलाच्या स्लॅबचे काम ठेकेदाराने पूर्ण न केल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाका खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना
अणाव घाटचेपेड पुलाच्या स्लॅबचे काम ठेकेदाराने पूर्ण न केल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाका खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना;अणाव घाटचेपेड पुलाच्या कामाची केली पाहणी

तळगाव बाव येथील प्रस्तावित पुलाच्या जागेचीही केली पाहणी

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी अणाव घाटचेपेडवाडी ते मांजरेकरवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे पूल मंजूर केले आहे. यासाठी २ कोटी ६५ लाख रुपये मंजूर केले आहेत. मात्र ठेकेदाराने हे काम रखडवले असल्याने आज या पुलाच्या कामाची पाहणी खा.विनायक राऊत, आ वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांसोबत केली. अधिकारी व ठेकेदाराच्या कामावर नाराजी व्यक्त करत २० मे पर्यंत पुलाच्या स्लॅबचे काम ठेकेदाराने पूर्ण न केल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सक्त सूचना खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता के. के. प्रभू यांना दिल्या.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सोनवडेपार-वराड-पुलाच्य/

त्याचबरोबर गेली अनेक वर्षे मागणी असलेल्या कर्ली नदीवर तळगाव बाव येथे नवीन पुलाचे काम प्रस्तावित आहे या प्रस्तावित असलेल्या पुलाच्या जागेची पाहणी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली. व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. लवकरच या पुलाच्या कामाला मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अणाव घाटचेपेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, दीपक आंगणे, बाळू पालव, सरपंच लीलाधर अणावकर, बाबा परब, गजानन कुलकर्णी, अर्थव अणावकर, समीर आंगणे, विकास अणावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपभियंता के. के. प्रभू , आर. एच. पवार उपस्थित होते.

तळगाव येथे सरपंच लता खोत, उपसरपंच संतोष पेडणेकर, माजी उपसरपंच प्रसाद दळवी,तंटामूक्ती अध्यक्ष सूरेश दळवी, वासूदेव दळवी ,यशंवत तळगावकर,दाजी दळवी प्रशांत दळवी,दिलीप दळवी व गावातील अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here