मुबंई- राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून २० हजार पदांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पोषण २.०’अंतर्गत आता पदभरतीसाठी दहावी नव्हे तर बारावी उत्तीर्ण महिलांनाच संधी मिळणार आहे. मदतनीस पदासाठी सातवी उत्तीर्णची अट कायम राहणार आहे. २६ जानेवारीनंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-शिवसेनेच्या-मासिक-बैठक/
अंगणवाडी सेविका होण्यासाठी पूर्वीपासून दहावी उत्तीर्ण अशी अट होती. परंतु, अंगणवाड्यांमधील ७५ लाख विद्यार्थ्यांची दररोज ‘पोषण ट्रॅकर’ ॲपद्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता सेविकांच्या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल. त्यासंबंधीचा शासन निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे. ३० जानेवारीपूर्वी मदतनीस महिलांना शैक्षणिक पात्रतेनुसार सेविकापदी पदोन्नती दिली जाणार आहे.