Sindhudurg : अळंबी नि कोळंबी….अळंबीत सर्वांधिक पोषणमूल्य पण…-भाई चव्हाण काय म्हणतात पाहा….

0
103
अळंबी नि कोळंबी....अळंबीत सर्वांधिक पोषणमूल्य पण... -भाई चव्हाण काय म्हणतात पाहा....jpg

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

कणकवली:-दि. ५- कोकणात श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या दरम्यान नैसर्गिकरीत्या मुंग्यांच्या काही वारुळांत अळंबीची पैदास होते. खरे खवय्ये कोणतीही किंमत देऊन ती खरेदी करतात. तर दुसरीकडे खवय्ये कोळंबीवरही तुटून पडतात. पण काही अळंबी उत्पादक कुत्रिमरीत्या अतिशय पौष्टिक मुल्य असलेल्या अळंबीचे वितरण करतात.‌ पण या अळंबीला अद्याप म्हणावी तशी बाजारपेठ मिळत नाही, असे शल्य अळंबी उत्पादक फार्मकडून व्यक्त केले जात आहे. ही बाब मानवी आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आहे, असे स्पष्ट मत कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, पत्रकार आणि आरोग्य सल्लागार गणपत तथा भाई चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurrg-सिंधुदुर्ग-जिल्ह्याती/

अळंबीच्या अगणित पोषणमूल्यांमुळे जनतेने आपल्या आहारात अंळबीचा समावेश आवर्जून करावा, असे आहार विषयक तज्ज्ञ नेहमीच सांगत असतात. पण हे घडताना दिसत नाही , असे स्पष्ट करून चव्हाण म्हणाले, कोकणात नैसर्गिकरित्या मिळणार्या‌ अळंबीला किलोला‌ रुपये १०००/- मोजले जातात.‌ तिचे पोषण‌ मूल्य‌ आणि चविष्ठपणा सर्वोत्तम असल्याने ही किमंत मोजली जाते. मात्र कुत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या अळंबीतही तेवढीच पोषणमूल्ये असतात. मात्र खवय्यांना पुरेशी माहिती नसल्याने या अळंबीकडे म्हणावे तसे गांभिर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे या बाबतीत जनतेपर्यंत माहिती पोचविणे गरजेचे आहे.

दुसरीकडे आपण खवय्ये सरासरी रुपये ४००/- किलो दराने कोळंबीची खरेदी करतो. साफसफाई करून जेमतेम अर्धा किलो कोळंबी हाता तोडाशी येते. म्हणजे किलोचा भाव रुपये ८००/- पर्यंत जातो, असे स्पष्ट करुन चव्हाण यांनी आज बाजारात कोकणातील तरुण मंडळी उत्पादकांकडून घाऊक दरात ही अळंबी खरेदी करतात. योग्य भावाने‌ म्हणजे रुपये ३००/-च्या दराने विकतात. तरीही त्यांना अपेक्षित नफा मिळण्याऐवजी बर्यांचदा नुकसान सोसावे लागते. त्यामुळे अशा तरुणांना प्रोत्साहन देण्यासह अळंबीचे आहारदृष्ट्या किती महत्त्व आहे हे लोकांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here