वेंगुर्ला प्रतिनिधी – नॅक समितीच्या मुल्यांकनामध्ये वेंगुर्ला येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला ‘अ‘ मानांकन मिळाल्याबद्दल भाजपाच्यावतीने प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डी.बी.राणे, सहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम.भैरट, प्रा.डॉ.एम.बी.चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्ह्यात-शिष्यवृत्ती/
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा खानोलकर, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, महीला मोर्चा शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, माजी नगरसेविका श्रेया मयेकर तसेच संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा.डॉ.आनंद बांदेकर इत्यादी उपस्थित होते.
फोटोओळी – नॅक समितीच्या मुल्यांकनामध्ये खर्डेकर महाविद्यालयाला ‘अ‘ मानांकन मिळाल्याबद्दल भाजपाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


