प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
कणकवली- मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ आज बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुणे येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या केळकर ट्रॅव्हल्स कंपनीच्या आराम बसला (क्रमांक एम.एच.१२ के.क्यू.५७६९) आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लक्झरी मधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.


