‘Sindhudurg: ‘आपदा मित्र प्रशिक्षण ‘ कार्यक्रमाला २०२२-२३” कुडाळ येथे सुरुवात

0
53
'आपदा मित्र प्रशिक्षण ' कार्यक्रमाला २०२२-२३'' कुडाळ येथे सुरुवात

कुडाळ- आजपासून सुरु झालेल्या ”आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम २०२२-२३” आजपासून कुडाळ येथे सुरुवात झाली. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमामधून सर्व कॅडेटला नवीन शिकता येईल. यातूनच लीडरशिपचे गुण स्वतःमध्ये तयार करा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले आहे. आपत्तीच्या वेळी जागृत राहणे गरजेचे असते. आजवर अनेक आपत्ती आपल्या राज्यावर असो वा देशावर आल्यात. यावेळी आपत्तीकाळात सामाजिक बांधिलकी जपून समाजासाठी कार्यतत्पर होणे आवश्यक असते.https://sindhudurgsamachar.in/kolhapur-भावी-शिक्षक-भरतीच्या-

यावेळी कमान्डींग ऑफिसर ५८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, उपविभागीय अधिकारी आविशकुमार सोनाने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक आनंद परब, नागरी संरक्षण कार्यालय प्रशिक्षक अतुल जगताप, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक निलेश पवार आदी उपस्थित होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, (NDMA), नवी दिल्ली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA), महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) आयोजित ”आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम २०२२-२३” ला यासाठी जिल्ह्यातून एनसीसी आणि एनएसएस कॅडेट यामध्ये सामील झाले आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड पुढे म्हणाले, आपणही एनसीसी कॅडेट म्हणून कार्यरत होतो. लातूर भूकंपासारख्या घटना आपण पाहिल्या असून त्याचे अनुभव सुद्धा योवळी त्यांनी कथन केले. हा प्रशिक्षण कार्यक्रम १३ ते २४ जानेवारी २०२३ या कालावधीत होणार असल्याने या प्रशिक्षण शिबिरात सर्व कॅडेटला बहुमूल्य मार्गदर्शन मिळेल. उपविभागीय अधिकारी श्री.सोनाने म्हणाले, या प्रशिक्षणातून समाजसेवा करता येते. यातूनच राष्ट्रसेवा होते, तर आजपासून सुरु झालेल्या आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमातून नवे अनुभव कॅडेट्सला मिळतील. आपत्ती काळात आपण कशाप्रकारे सतर्क हवे, यावेळी मार्गदर्शनही प्रशिक्षणार्थीना केले. यावेळी कमान्डींग ऑफिसर कर्नल श्री. दयाल यांनी सुद्धा एनसीसी कॅडेट्ससाठी हे प्रशिक्षण किती महत्वाचे आहे, याबाबत मार्गदर्शन केले. यातून आजच्या युवा वर्गाला नवीन शिकायला मिळेल, असा विश्वासही व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here