वेंगुर्ला प्रतिनिधी- आरवली विकास मंडळ संचालित आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र, आरवली या संस्थेला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त सोमवार दि.२४ एप्रिल रोजी आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र येथे ‘रौप्य महोत्सव‘ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी श्रीसत्यनारायण महापूजा, महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी २.३० वा. कृतज्ञता सोहळा, ४ वा. भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम, सायं.५ वा. संस्थेचे संस्थापक व योगदान देणायांचा सत्कार, गावातील मान्यवर व कलाकारांचा कौतुक सोहळा होणार असून यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, नेत्ररुग्णालयाचे प्रवर्तक सुरेश प्रभूझांटये, आरवली व सागरतीर्थचे सरपंच, डॉ.उल्हास प्रभू नाचनोलकर, आरवली विकास मंडळाचे संस्थापक मार्गदर्शक रघुवीर उर्फ भाई मंत्री, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गजानन पेडणेकर, कार्यकारी मंडळ मुंबईचे अरुण देसाई, स्थानिक व्यवस्थापन समितीचे डॉ.डी.टी.शिवशरण, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते महादेव आंदुर्लेकर व अविनाश चमणकर हे उपस्थित राहणार आहेत.https://sindhudurgsamachar.in/maharashtrखारघर-येथील-महाराष्ट्र/
तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन मुंबई विश्वस्त मंडळ अध्यक्ष, आरवली स्थानिक व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष, मुंबई कार्यकारी मंडळ अध्यक्ष, सर्व सदस्य परिवारातर्फे केले आहे.