Sindhudurg: आरोग्य सेविकांच्या भरतीत एन.आर.एच.एम.च्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्या

1
134
आरोग्य सेविकांच्या भरतीत एन.आर.एच.एम.च्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्या
आरोग्य सेविका भरती

आ. वैभव नाईक यांची विधानसभा अधिवेशनात मागणी;ग्रामविकास मंत्र्यांनी दर्शविली सकारात्मकता

ग्रामविकास विभागांतर्गत आरोग्य सेविकांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्या भरतीत एन.आर.एच. एम.अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात केली.त्या मागणीबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दर्शविली.त्याबद्दल एन. एच. एम. राज्य संघटनेचे अध्यक्ष किरण शिंदे ,उपाध्यक्ष स्वनिल गोसावी यांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुदृढ-बालकांमध्ये-सारक/

एन.आर.एच.एम.अंतर्गत राज्यात आरोग्य सेविकांची ३५०० पदे भरलेली आहेत. गेली १० ते १२ वर्षे या आरोग्य सेविका आरोग्य विभागात उत्तम सेवा देत आहेत.त्यांच्या प्रश्नाबाबत आरोग्य मंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने एन.आर.एच.एम. कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेत ४० टक्के आरक्षण व जेवढी वर्षे एन.आर.एच.एम.मध्ये सेवा केली तेवढी वर्षे वयाची अट शिथिल करण्याचा निर्णय ८ मे २०१८ रोजी दिला आहे. याकडे आ. वैभव नाईक यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. आता ग्रामविकास विभागांतर्गत आरोग्य सेविकांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्या भरतीत एन.आर.एच. एम.अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्य देण्याची मागणी आ.वैभव नाईक यांनी केली. या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे उत्तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

        

1 COMMENT

  1. […] कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे बजेट २०२३-२४ अंतर्गत मालवण तालुक्यातील देवबाग,तळाशील तोंडवली,सर्जेकोट,वायरी, धुरीवाडा,मसुरकर खोतजुवा,निशान काठी याठिकाणच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.या कामांसाठी एकूण ४२ कोटी रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे व निधी पुढीलप्रमाणे आहेत.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आरोग्य-सेविकांच्या-भर… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here