Sindhudurg: उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला मांडवा जेट्टीजवळ अपघात; मंत्री उदय सामंत व छत्रपती संभाजीराजे सुखरूप

0
97
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटी ला मांडवा जेट्टीजवळ अपघात
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटी ला मांडवा जेट्टीजवळ अपघात मंत्री उदय सामंत व छत्रपती संभाजीराजे सुखरूप

मुंबई : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटीचा मांडवा जेट्टीजवळ अपघात झाला. जेट्टीजवळ बोट पार्क करताना चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.सुदैवाने या अपघातात कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही. उद्योग मंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे हे सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-१५-एप्रिलपर्यंत-संपणार/

मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी रायगडमधील अलिबाग येथे जात होते. या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मुंबईहून आम्हाला घेऊन जाणारी स्पीडबोट मांडवा जेट्टीत शिरली असता ती एका खांबावर आदळली. मात्र, बोट चालकाने लगेच नियंत्रण मिळवले
या कार्यक्रमासाठी उदय सामंत हे बोटीतून अलिबागने जात होते. तिथे जात असताना पार्किंग दरम्यान पहिल्या पिलर नंतर दुसऱ्या पिलरला बोट धडकली. त्याच बोटीमध्ये उदय सामंत, त्यांचे सहकारी आणि इतर नेते होते. मात्र संपूर्ण स्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यात आली. कुठेही कुणालाही दुखापत झालेली नाही. उदय सामंत हे सुखरुप आहेत. विशेष म्हणजे, याआधी सुद्धा उद्योग मंत्री उदय सामंत यांची बोट भर समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यावेळी तटरक्षक दलाने रेस्क्यू ॲापरेशन करत भर समुद्रातून सुटका केली होती. त्यानंतर आज मांडवा जेट्टीजवळ बोटीला अपघात झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here