असे उपक्रम वारंवार व्हावेत – शेखरकुमार आहिरे
प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदूर्गने आयोजित केलेल्या मराठा व ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांकरिता कमर्शियल व्हेईकल एक्सपो 2022 चे राजापूर अर्बन बँकेचे सीईओ श्री. शेखरकुमार अहिरे यांनी कौतुक केले. तसेच बँकेला प्रतिनिधित्व देत या मेळाव्यात सामावून घेतल्याबद्दल महासंघाचे आभार मानले. याबाबतचे पत्र त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांना पाठविले.
या पत्रात असे म्हटले आहे की, मराठा महासंघाच्या प्रत्येक सदस्याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या मेळाव्याचे आयोजन केले होते. तसेच राजापूर अर्बन बँकेच्या कुडाळ शाखेतील शाखाधिकाऱ्यांचे केलेले कौतुक आणि सन्मान हे नेहमीच बँकेसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. मराठा महासंघाच्या अशा उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी आमची बँक नेहमीच कटिबद्ध आहे. भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम वारंवार व्हावे व त्या उपक्रमात आमच्या बँकेला समाविष्ट करून घ्यावे अशा विनंतीसह महासंघाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

