वेंगुर्ला प्रतिनिधी- सिहान अॅन्थोनी कार्निओ व सिहान प्रकाश सोरप यांच्या अधिपत्याखाली पाटकर हायस्कूल व वेंगुर्ला हायस्कूल येथे घेतलेल्या कराटे परिक्षेत प्रार्थना हळदणकर यांच्यासह ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. https://sindhudurgsamachar.in/simndhudrg-काजू-उद्योगातील-अडचणी-स/
यात नॉनव्हाईन फस्टमध्ये श्रीतेज परुळेकर, अमेज तोरस्कर, श्रेयांश सावंत, नॉनव्हाईन फस्ट-सेकंडमध्ये प्रज्वल खेडकर, हृदयांशू माने, सान्वी काकडे, स्वदिप उकिडवे, निरज खारोल, प्राजक्ता खेडकर, भूमी परुळेकर, उज्वल तांडेल, शर्व आपटे, यलो बेल्टमध्ये अर्थव तोडकर, दिव्यांका लटम, भूमिका घाडी, ऋतुजा कुबल, साक्षी शेट्टी, पृथा जोशी, गौरी वाडकर, मयंक नंदगडकर, कोमल घाडी, ग्रीन बेल्टमध्ये सुशिल धुरी, दिया रेडकर, ब्लू बेल्टमध्ये जान्हवी मडकईकर, डेविना डिसोजा, जान्हवी वेंगुर्लेकर तर ब्राऊन बेल्टमध्ये आल्फिया शेख यांनी यश संपादन केले. तसेच जान्हवी वेंगुर्लेकर, कृष्णा हळदणकर व आल्फिया शेख यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्वांना भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.डी.कांबळे, वेताळ प्रतिष्ठानचे सचिन परुळेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बेल्ट वितरण करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक सेनसाय पुंडलिक हळदणकर व प्रार्थना हळदणकर उपस्थित होते.
फोटोओळी – कराटे परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बेल्ट वितरीत करण्यात आले.