महिला दिनाचे औचत्य साधत काव्यप्रेमी शिक्षक मंच सिंधुदुर्ग आणि दै. सिंधुदुर्ग समाचार काव्यलेखन स्पर्धा घेत आहोत. तसे पहिले तर नवदुर्गेचे रूप असलेली महिला रोजचा दिवस स्वतःच्या कुटुंबासाठी अगदी चारीही बाजूनं लक्ष ठेऊन लढत असते. तिच्यासाठी प्रत्येक दिवस हा महिला दिन असतो. कोणतेही कुटुंब महिले शिवाय अधुरे आहे. ही महिला आजी,आई,बहीण,पत्नी या ना त्या रूपात कुटुंबाला आधार देत असतेच. तसेच ही महिला कोणताही मोबदला न घेता प्रामाणिकपणे राबत असते. म्हणूनच तिचे कौतुक करण्यासाठी आम्ही ही स्पर्धा घेत आहोत. https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकणातील-आव्हानात्मक-भौ/
स्पर्धेचा दिनांक- ८ मार्च २०२३.
👩🏼🦰 स्पर्धेचा कालावधी – सदर दिवशी सकाळी ८ ते रात्री ११.०० वाजेपर्यंत.
👩🏼🦰काव्यलेखन विषय- नारीशक्ति, नारीजगत.
👩🏼🦰 दिलेल्या विषयावरच काव्यलेखन करायचे आहे. कृपया अन्य विषयावरील कविता पाठवू नये.
👩🏼🦰 स्पर्धेसाठीची स्वलिखित काव्यरचना टेक्स्ट स्वरुपातच पाठवायची आहे.
👩🏼🦰काव्यप्रकार कोणता असावा याचे बंधन नाही.
👩🏼🦰छंदबद्ध व वृत्तबद्ध काव्यरचना असेल तर ती ६ कडव्यांपेक्षा मोठी नसावी. छंदबद्ध किंवा वृत्तबद्ध असेल तर त्या छंदाचे वा वृत्ताचे नांव लिहीणे आवश्यक आहे. मुक्तछंद रचनाही २५ ओळींपेक्षा मोठी नसावी.
👩🏼🦰एका सदस्यास केवळ एकच काव्यरचना पाठविता येईल.
👩🏼🦰कवितेत आक्षेपार्ह व वादग्रस्त ओळी असता कामा नये.
👩🏼🦰एखादी रचना आवडल्यास कौतुक करण्यास हरकत नाही. त्याचा परिक्षणावर प्रभाव पडणार नाही.
👩🏼🦰काव्यरचना प्रमाणबद्ध मराठी भाषेत असावी. इतर बोलीभाषेत नको.
👩🏼🦰सदर स्पर्धेचा निकाल दि. १४ मार्च २०२३ रोजी रात्री ठीक आठ वाजता जाहीर करण्यात येईल. निकालासंदर्भात मधल्या काळात विचारणा करु नये.
👩🏼🦰स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ-२ स्पर्धकांना डिजिटल सन्मानपत्र वितरित करण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांनाही सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
👩🏼🦰स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या काव्यप्रेमी सिंधुदुर्ग समूहात दाखल असलेल्या कवींनी त्यांची कविता काव्यप्रेमी सिंधुदुर्ग समूहात तर इतरांनी 9421795955 या व्हाटस् ॲप क्रमांकावर पाठवावी. कवितेवर ‘ स्पर्धेसाठी ‘ असा स्पष्ट उल्लेख असावा.
👩🏼🦰काव्यलेखन स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा!