खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुपवडे गावात उभारला बी.एस.एन.एल. टॉवर;आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन
कुपवडे : खासदार विनायक राऊत यांनी कुपवडे येथे बी. एस. एन. एल. मोबाईल टॉवर मंजूर केला असून प्रत्यक्षात हा टॉवर उभारण्यात आला आहे. आज या टॉवरचे उदघाटन खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. गेली अनेक वर्षे कुपवडे गावात बी. एस. एन. एल. मोबाईल रेंजची समस्या होती. खा.विनायक राऊत यांनी पाठपुरावा करून टॉवर मंजूर केल्याने हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ल्यात-सावरकर-सन/
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,माजी जि. प.गटनेते नाग्रेंद्र परब, तालुकाप्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, माजी उपसभापती जयभारत पालव बी. एस. एन. एल. चे उपमंडळ अभियंता श्री. देशमुख,शिवसेना उपतालुका महेश सावंत,पी. डी. सावंत, बापू मेस्त्री, राजू सावंत, सतीश सावंत, संजना सावंत, भावेश परब,दाजी ढवण, तेजस भोगले, काशीराम घाडी, दीपक घाडी, अवि नाईक, बाबी गुरव, गुरु मेस्त्री, उत्तम बांदेकर, रुपेश घाडी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.