वैभववाडी – प्रसाद साळुंखे गणेशोत्सवा निमित्ताने, कुसूर गावातील ग्रामस्थांसाठी, कुसूर विकास मंच संस्थेतर्फे आयोजित घरगुती गणेश दर्शन स्पर्धचा निकाल आज जाहीर करण्यात आला. प्रथम क्रमांक श्री दत्ताराम शंकर काटे (कुंभारीवाडी) आणि सौ स्मिता संतोष पाटील (टेंबवाडी) यांच्या पर्यावरणपूरक सजावट आणि इकोफ्रेंडली गणेशमूर्ती यांच्यासाठी विभागून देण्यात आला. तसेच द्वितीय क्रमांक – श्री प्रसाद रामचंद्र साळुंखे (खडकवाडी) आणि तृतीय क्रमांक – श्री विलास पाष्टे (पिंपळवाडी) यांना जाहीर करण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिक – श्री दयानंद शिवराम धुमक (पिंपळवाडी) यांना देण्यात आला.
सहभागी स्पर्धक श्री मनोज रमेश काटे (कुंभारी), श्री सिद्धेश श्रीराम सोगम (पिंपळवाडी), श्री अनंत पुंडलिक कदम (मधलीवाडी), श्री योगेश प्रकाश आंब्रस्कर (पिंपळवाडी), श्री प्रवीण आकाराम रासम (कुंभारी), श्री महेंद्र लवू नामये (पिंपळवाडी), श्री राजेंद्र गणपत काटे (कुंभारी), श्री मोतीराम गोविंद पाटील (मधलीवाडी) यांना “विशेष लक्षणीय बाप्पा” पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कुसूर गावातील सर्वच ग्रामस्थांनी सदर स्पर्धेत सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे असे संस्थेचे सचिव श्री चंद्रकांत रासम यांनी सर्वांचे आभार मानताना आपले मत व्यक्त केले आहे.
सदर गणेश दर्शन स्पर्धेच्या सर्व विजेत्यांचे आणि सहभागी स्पर्धकांचे कुसूर विकास मंच तर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना रोख रक्कम, सहभागी प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे.


